सणसवाडीत विद्यार्थी दिन साजरा

0

सणसवाडी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील प्रवेश दिवस म्हणून 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. सणसवाडी येथील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी येथेही हा दिवस मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व विविध कार्यक्रम पार पडले. शिरूर बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी विद्यार्थ्यांना वही आणि पेनचे वाटप करण्यात आले. सुदाम पवार, सुनिल पवार, पत्रकार रामदास लोखंडे, विश्वनाथ घोडके, धमपाल कांबळे, तात्याराव मोरे, अशोक आठवले, रामदास हरगुडे, गणेश दरेकर, मुख्याध्यापक पाटील बुवा मिडगुले आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा फुंदे तर आभार राधिका कर्डीले यांनी मानले.