सणसवाडीत विश्वकर्मा जयंती उत्सहात साजरी

0

सणसवाडी । यंत्र देवता म्हणून यंत्र कारागीर व हस्त कलाकार मंडळी विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्सहाने साजरी करतात. सणसवाडीच्या उद्योग नगरीमध्ये रविवारी (दि.17) विविध अवजड उद्योग समुहात तसेच वर्क शॉपमध्ये, क्रेन, गाड्यांची बांधणी करणार्‍या गॅरेजमधील कारागिरांनी विश्वकर्मा जयंती साजरी केली.

यानिमित्त काम करत असल्याठिकाणी भव्य आरास उभारण्यात आली होती. यात बिहारी, उत्तरप्रदेश, बंगाली बांधवांनी मुर्ती तसेच प्रतिमा स्थापन करून होमहवन, पूजाअर्चा, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम करून नवनिर्माण करणार्‍या अवजारांचे पूजन केले. वर्षभर जे अवजार व हत्यार वापरले जाते, त्याचे यावेळी पूजन केले जाते. महाप्रसादही ठेवण्यात आला होता.