सणसवाडी । सणसवाडीतील पुणे-नगर रोड चौक ते नरेश्वर मंदिररोड रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिक हैराण झाले होते. येथील फोसिको इंडिया लिमिटेड व ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून या रस्त्याचे काम मार्गी लागल्याचे सरपंच रमेश सातपुते यांनी सांगितले.
मुख्य चौक ते नरेश्वर रोड अशा दीड किमी अंतराचे सिमेंट काँक्रीटीकरण होणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच रमेश सातपुते, उपसरपंच राहुल दरेकर, बाबासो दरेकर आदींसह सदस्यांनी कंपनीकडे मदतीचे आवाहन केले होते. कंपनीने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत 31 लाखांचा निधी दिला. औद्योगिक विकासाला कारखानच्या वतीने सहकार्य मिळत असून सामाजिक दायित्व निधीतून शैक्षणिक, तसेच स्वच्छतेची कामे मार्गी लागत असल्याचे सातपुते यांनी सांगितले. शिवाजी दरेकर, गणेश दरेकर, नवनाथ हरगुडे, नवनाथ भुजबळ, नामदेव दरेकर, रामदास दरेकर, विद्याधर दरेकर, भाऊसो दरेकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.