जळगाव। पोलिस मुख्यालयातील प्रेरणा हॉल येथे बुधवारी नाशिक परिक्षेत्रातील विशेष महापोलिस निरीक्षक विनयकुमार चौबे यांनी गणेश उत्सव तसेच सणांच्या पार्श्वभुमीवर आढावा बैठक घेवून शहरात घडलेल्या घटनांचा तसेच गुन्हेगारांवर करण्यात येणार्या कारवाईंचा आढावा घेतला.आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभुमीवर धुळे, नंदूरबार येथे आढावा बैठकी घेतल्यानंतर विशेष महापोलिस निरीक्षक चौबे हे बुधवारी जळगावात आले होते. यावेळी सकाळीच चौबे यांनी मुख्यालयात सर्व पोलिस अधिकार्यांची आढावा बैठक घेतली.
सहा महिन्यांच्या गुन्ह्यांचा घेतला आढावायावेळी बैठकीत पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक बच्चनसिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत चौबे यांनी जानेवारी ते जुन या सहा महिन्यात घडलेल्या घटनांचा तसेच गुन्ह्यांचा आढावा घेत गुन्ह्यांची आकडेवारी जाणून घेतली. यातच गणेश उत्सव जवळच येत असल्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी तसेच त्याच्या प्रस्ताव तयार करण्यात येवून कारवाई करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी केल्या. यातच 2100 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्तावही तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बैठकीत दिली.चोरटी वाळु वाहतुकदारांचे शस्त्र परवाने रद्द.. यासोबतच भुसावळ येथे नवीन बांधकाम झालेल्या एसडीपीओ कार्यालय व भुसावळ तालुका पोलिस ठाण्याची विशेष महापोलिस निरीक्षक चौबे यांनी घेतली. यातच एनपीडीएच्या कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. तर एनपीडीएसाठी पाच जणांचे प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी बैठकीत दिली. यातच शहरासह जिल्ह्यात वाळुची चोरटी वाहतुक जोमात होत असून त्यांच्याकडे असलेल्या शस्त्र परवान्यांचा ते गैरवापर करीत आहेत. त्यामुळे वाळुची चोरटी वाहतुक करणार्यांचे आता शस्त्र परवाना रद्द करण्यात येईल अशी माहिती बैठकीत दिली.