सण उत्सव लक्षात घेता तीन हद्दपारी जेरबंद

0

हद्दपार असतांनाही आढळले शहरात; पोलीसांनी घेतले ताब्यात

धुळे । शहरात गणेशोत्सव व बकरीईद सणांचे कालावधीत शांतता अबाधीत रहावी याकरीता उपविभागीय दंडाधिकारी यांनी 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत या कालावधी धुळे तालुका हद्दीतून सीआरपीसी कलम 144(2) अन्वये तीन जणांना हद्दपार केले आहे. रात निशांत विधाते रा.यशवंतनगर धुळे, मयुर मच्छींद्र शार्दुल रा.रेल्वेस्टेशन परिसर धुळे, ललीत ज्ञानेश्‍वर मराठे रा.श्रीरामनगर धुळे रांचा समावेश आहे. हद्दपार असतांनाही संबंधीत परिसरात आढळून आल्राने पो.नि.दिलीप गांगुर्डे यांनी 31 ऑगस्ट रोजी संबंधीतांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्रा विरूद्ध हिरालाल बैरागी यांनी कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले असून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उपविभागीय दंडाधिकारी यांना सादर केला आहे.

दोषारोप पत्र दाखल
अटक केलेल्या इसमांवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करीत आहेत. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक एम.रामकुमार यांच्रा सुचनेप्रमाणे अपर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव, पो.नि.दिलीप गांगुर्डे यांचे मार्गदर्शनाखाली शोधपथकाचे पोलिस उपनिरीक्षक नाना आखाडे, हिरालाल बैरागी, नारायण कळसकर, पोहकॉ मिलींद सोनवणे, पोहेकॉ मिलींद सोनवणे, पोहेकॉ जे.बी.खैरनार, पो.ना.मुख्तार मन्सुरी, पो.ना.एकलाख पठाण, पोकॉ पंकज खैरमोडे, पोकॉ दिपक दामोदर, पोकॉ योगेश चव्हाण यांनी केली आहे. गणेशोत्सव बकरीईद सणांचे काळात धुळे शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या इतर गुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेवण्यात येत असून आढळून आल्यास त्यांच्रा विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्रात रेणार आहे.