सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन

0

पाचोरा । गणेशोत्सव व बकरी इदच्या हिंदू-मुस्लिम बांधवांकडून साजरे होणारे सण उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पाचोरा पोलिस विभागाच्या वतीने शहराच्या मुख्या मार्गातून व विवध भागातून पोलिसा अधिकार्‍यांचा उपस्थितीत पथसंचलन करण्यात आले. सद्यस्थितीत हिंदू बांधवांचा गणेशोत्सव सुरू आहे. तर मुस्लिम बांधवांकडून बकरी इद साजरी होणार आहे. या कामात कोणाही अनुचित प्रकार अपप्रवृत्ती किंवा समाज कंटकांकडून घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज व सतर्क आहे.

शांतता समितीच्या बैठकांमधून हिंदू-मुस्लिम व सर्व समाजाच्या व्यक्ती, राजकिय, सामाजिक पदाधिकार्‍यांनी उपस्थित पोलिस विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत सर्वांनी आपापले सण, उत्सव, ईद, सामाजिक, एकता, राष्ट्रीय, अखंडता व शांतेत साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर पाचोरा शहराच्या मुख्य रस्त्यांवरून आणि विविध भागातून पोलिस उपविभागीय अधिकारी केशव पातोंड, पोलिस निरीक्षक श्याम सोमवंशी यांच्या नेतृत्वा शहरातून शक्तिप्रदर्शन करण्यात आली.