सण-उत्सव शांततेत साजरे करा

0

* अप्पर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी यांचे प्रतिपादन
* आगामी सणानिमित्त पोलिस स्टेशनला झाली बैठक
रावेर । आगामी काळात येणारे सण उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्याचे अवाहन अप्पर पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले आहे. याबाबत वृत्त असे की, बकरी ईद व दहीहंडी निमित्त रावेर पोलिस स्टेशनला शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. यावेळी श्री मतानी बोलत होते. बैठकीला विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग, तहसीलदार विजयकुमार ढगे, रावेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोमने, नगराध्यध्यक्ष दारा मोहोम्मद उपनगराध्यक्ष अ‍ॅड. सूरज चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी, नगरसेवक सादीक शेख, असदुल्ला खा, महावीतरणचे पी.बी. चौधरी, अशोक शिंदे, दिलीप कांबळे, शेख महमूद, गयास शेख, सुनील अग्रवाल, महावीतरणचे शहर अभियंता योगेश पाटील, अ‍ॅड.एम.ए.खान, डॉ. ओतारी यांच्यासह मोठ्या संखेने शांतता समितीचे हिंदु-मुस्लिम पंच कमीटीचे सदस्य उपस्थित होते.