चिंबळीः जुन महिन्यात पावसाळा सुरू झाला की दहा पधंरा दिवसात भातरोपे तयार करण्यासाठी साखळीची दाड टाकून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भात लागवड करतात. परंतु यावर्षी मध्यंतरी पावसाने दीड मारली होती. त्यात ढगाळ वातावरण व उन्हाचा तडाखा बसल्याने भातरोपाची वाढ पिवळी पडल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत होते. पण गेल्या पधंरा दिवसांपासुन पावसाने पुन्हा मोठ्या प्रमाणात रिमझिम सुरू केली असल्याने भातरोपे हिरवीगार झाली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. येत्या पंधरा दिवसात या रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले आहे.