सतपंथ कला केंद्राच्या शिबिरास प्रतिसाद

0

फैजपूर। सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सतपंथ कला केंद्राचे उन्हाळी शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन महामंडलेश्‍वर जनार्दन महाराज यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास जितेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांच्या शारिरीक, मानसिक, बौध्दिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक विकासासाठीचे उपक्रम राबविण्यात आले. निरोगी आयुष्यासाठी संगीतोपचार या विषयावर डॉ. विलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.

गायनाचा कार्यक्रम
स्मरणशक्ती स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळविली. शेवटच्या सत्रात रावेर येथील प्रभुदत्त मिसर यांचा गायनाचा कार्यक्रम होता. दुसर्‍या दिवशी कविता पवार यांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन झाले.

गुणदर्शनाने शिबिराचा समारोप
तसेच परिसरातील कर्तृत्ववान व्यक्तिंमध्ये डॉ. हरीष तळेले यांची मुलाखत घेण्यात आली. प्रश्‍नमंजुषा कार्यक्रमास भाग्यश्री नेहेते, अश्‍विनी जोशी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. शेवटच्या सत्रात प्रा. राजू पटेल यांनी मिमिक्रीचा कार्यक्रम सादर केला. शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रम शिबिराचा समारोप करण्यात आला.