सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘कोरोना वीर 2020’ पुरस्काराने योद्ध्यांचा सन्मान

0

मानवसेवा परमो धर्म चित्रफितीचे उद्घाटन : महामंडलेश्‍वर जनार्दन महाराज यांची उपस्थिती

फैजपूर : गेल्या तीन महिन्यापासून आपलं कुटुंब, संसार सोडून स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना, नागरीकांसाठी प्रबोधन, बाधीतांना वेळेवर अचूक योग्य उपचार यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करून रात्रंदिवस झटणार्‍या कोरोना योद्ध्यांचा सत्कार फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सावदा येथील जफर लॉनमध्ये करण्यात आला.

यांचा कार्यक्रमात झाला सन्मान
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पू.महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज होते. या कार्यक्रमात ‘मानवसेवा परमो धर्मः’ ही हाजी शब्बीर हुसेन हाजी अखतर हुसेन उर्फ बाबू शेठ यांच्या कार्यावर आधारित चित्रफितीचे उद्घाटन करण्यात आले. भुसावळ येथील प्रसिद्ध आर्किटेक्चर भावेशभाई टाक यांनी हिंदूस्तान पेट्रोलियम पंपचे संचालक तथा समाज प्रेमी, समाज सेवक बाबुशेठ यांनी कोरोना विषाणूच्या कार्यकाळात गेल्या तीन महिन्यापासून परप्रांतीयांसाठी तथा स्थानिक रहिवाशांसाठी केलेली सेवा चित्रफितीत दाखविली. बाबू शेठ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात बाबुशेठ, यावल-रावेर विभागाचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, फैजपूरचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ, सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे, डॉ.श्याम बारेला, महावितरणचे अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांचा ‘कोरोना वीर 2020’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी प्रत्येकाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.

यांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुरेश शास्त्री मानेकर बाबा, नगराध्यक्ष अनिता येवले, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, राजू चौधरी यांच्यासह चाळीस-पंचेचाळीस मान्यवरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करून हा कार्यक्रम झाला. जाती-पातीच्या पलीकडे काम करीत असलेल्या बाबू शेठ यांच्या निस्पृह कार्याचा परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी ी गौरव केला. तसेच ‘मानवसेवा परमो धर्मः’ या लघुपटातून समाजात माणसाने कोणते कार्य करावे याचे प्रबोधन होईल. सर्व समानार्थी ते करीत असलेले कार्य महत्वपूर्ण असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले. यावेळी प्रांत डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नंदकिशोर पाटील तसेच उपस्थितांचे आभार ट्रस्टचे संचालक संजीव महाजन यांनी मानले.