भुसावळ । तालुक्यातील कंडारी येथील सतपंथ महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम 20 रोजी दुपारी 12.5 वाजता आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर प्रसारीत करण्यात येणार आहे. फैजपूर येथील सतपंथरत्न महामंडलेश्वर स्वामी जर्नादन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सतपंथ महिला भजनी मंडळाने सादर केलेल्या भजन कार्यक्रमाची नोेंद आकाशवाणीने घेतली असून याचे सादरीकरण नुकतेच झाले आहे.
जळगाव केंद्रावर प्रसारण
हा कार्यक्रम आकाशवाणी जळगाव केंद्रावर माहेर या विभागात दुपारी 12.2 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. तरी परिसरातील साधकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.