भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील सतपंथ मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते मंदिरावर शांतीरुपी ध्वजाचे व आदीशक्तीच्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. वर्धापनदिनी सतपंथ ध्वजेला महत्वाचे स्थान असते. त्यामुळे ध्वजारोहणापासूनच कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सकाळी सतपंथ घटपाट पुजाविधी डोंबिवलीचे मुखी शंकर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
धकाधकीच्या जीवनात सणांची जोपसना करावी
यावेळी जनार्दन महाराजांनी भाविकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे सतपंथ मंदिराचा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गावातील इतरही समाजबांधवांनी इतर मंदिरांचा वर्धापनदिन साजरा करावा जर मनुष्य आपला वाढदिवस साजरा करतो मग आपल्या कुल परंपरेतील देवी देवतांच्या मंदिराचा वर्धापनदिन का साजरा करु नये आजच्या धकाधकीच्या जीवनात मानव हा विविध सणांसोबत देवीदेवतांना सुध्दा विसरत चाललेला आहे.
तंत्रज्ञानाचा योग्य ठिकाणी वापर व्हावा
मोबाईल, संगणक हाताळताना धार्मिक परंपरांपासून तो दुरावत आहे. त्यामुळे पालकांनी व पाल्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर योग्य ठिकाणी करण्याचे आवाहन केले. यानंतर युवराज महाजन यांच्याकडून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी गुजरात, मुंबई, फैजपूर, यावल, राजोरा, काहूरखेडा, पुणे व खान्देशातील विविध ठिकाणाहून भाविकांची उपस्थिती होती.
यांची होती उपस्थिती
मुखी कोमलदास महाजन, मुखी मोहन महाजन, हरचंद महाजन, काशिराम महाजन, प्रभाकर महाजन, अशोक नारखेडे, भागवत महाजन, वसंत नारखेडे, अरुण महाजन, मिलींद पाटील, लिलाधर महाजन, प्रकाश महाजन, प्रमोद महाजन, किशोर महाजन, सचिन नारखेडे, निखील बोंडे, विजय महाजन, प्रभाकर महाजन, भुषण नारखेडे, पुर्वेश हाजन, निखील महाजन, कल्पेश महाजन, राकेश महाजन, मितेश महाजन, मोहित महाजन, रोनित नारखेडे, वेदांत नारखेडे, गोविंदा महाजन, किसन महाजन, दोधू फिरके, प्रल्हाद पाटील, गोपाळ नारखेडे, वासुदेव झोपे आदी उपस्थित होते.