डोंबिवली : अनेक प्रसिद्ध गायकांना साथ करणारे सतारवादक आणि अखंड उत्साहाचा झरा म्हणून ओळख असलेल्या पंडित रसिक हजारे (वय 58) यांचे आज (बुधवार) पहाटे आकस्मिक निधन झाले. भारतरत्न पंडित रविशंकर आणि शमीम अहमद खान यांचे शिष्य रसिक हजारे हे मद्रास विश्व विद्यालयाचे एम फिल होते. मुंबई विश्व विद्यालय, नाथीबाई विश्व विद्यालयात तसेच डोंबिवली येथील ’रसिक संगीत विद्यालय येथे त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना सतारवादनाचं मार्गदर्शन केले.