मुंबई – राज्य पोलीस दलाचे महासंचालक सतीश माथूर यांचा आज ३० जून पोलीस सेवेतील शेवटचा दिवस आहे. माथूर हे १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी २ वर्षे राज्य पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिले. आज मुंबईतील नायगाव मैदानावर पोलीस खात्यातर्फे त्यांना सेवा निवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. आता सेवाज्येष्ठतेनुसार मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदावर २ महिन्यांसाठी नियुक्ती होणार आहे.
सुबोध जयस्वाल नवे मुंबईच्या पोलीस आयुक्त?
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सध्या ते भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये कार्यरत आहेत. दत्ता पडसलगीकर सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. आज दुपारपर्यंत सुबोध जयस्वाल मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेण्याची शक्यता आहे. १९८५ च्या बॅचचे आयपीएस सुबोध कुमार यांची अचानक मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. दत्ता पडसलगीकर यांच्याप्रमाणे लो प्रोफाईल असलेले जैस्वाल यांची दिल्लीतील भाजप नेत्यांशी असलेली जवळीक आणि वादग्रस्त नसलेली कारकीर्द सुबोध कुमार जैस्वाल यांच्या पथ्यावर पडू शकते.