अमळनेर। पुज्य सानेगुरुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेली अमळनेरची भूमी गुणवंतांची आहे. सत्कर्म केल्याशिवाय सत्कार होत नाहीत, शिक्षण हे नोकरीसाठीच आहे हा विषय मनातून आधी काढून टाका. शिक्षणातील मार्क हे केवळ आपल्याला पात्र ठरवते मात्र काय करायचे ते अंतर्मनाला विचारा, तुम्ही घडलात तर समाज घडेल असे अनमोल मार्गदर्शन पाचोरा येथील उद्योजक तथा माजी आमदार आर.ओ.पाटील यांनी येथे राजपूत समाजाच्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी केले. अमळनेर शहर व तालुका राजपूत एकता मंचच्या वतीने 10 वी,12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन अमळनेर येथी नांदेडकर सभागृहात करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांबाबत केले मार्गदर्शन
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विजयसिंग पवार यांनी स्क्रीनद्वारे जळगाव जिल्ह्यातील राजपूत समाजाच्या दोनदा यूपीएससी झालेल्या प्रज्ञाचक्षु प्रांजल पाटील सह पाच उच्चशिखर गाठलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दाखवून उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय पवार यांनी सूत्रसंचालन करतांना वेगवेगळी सुंदर उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा व जिद्द निर्माण केली. यामुळे कार्यक्रमात अधिकच रंगत आली, सुरवातीला मान्यवरांच्याहस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
मुलांना घडविण्यासाठी पालकांनी वेळ
यावेळी अध्यक्षस्थानी आर.ओ.पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रदीप पाटील, मारवडचे सपोनि अवतारसिह चौहान, प्रा. भरातसिंग पाटील, जैन एरिगेशनचे अभियंता विजयसिंग पाटील, आयआयटीचा विध्यार्थी अंकित पाटील यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थाना मार्गदर्शन करताना तहसीलदार प्रदीप पाटील म्हणाले की, दहावी व बारावीत चांगले गुण मिळाले म्हणून भारावून जाऊ नका, कारण यामुळे नुकसान होऊ शकेल. पालकांनीही मुलांवर दबाव न आणता प्रेरणा देत राहावी, प्रत्येक मुलात वेगवेगळी कौशल्ये असतात, यामुळे हर बच्चा खास आहे. केवळ त्याचे अवलोकन करा, मुलांना वेळ द्या, त्यांचेशी सतत बोला, त्यांच्या कलागुणांचे कौतुक करा आणि मुले घडविण्यासाठी पालकांनीच धेयवेडे बना यश निश्चितच मिळेल असे सांगून सोशल मीडियाचा चांगल्या माहितीसाठी उपयोग करा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच सपोनि चौहान, प्रा. पाटील व आयआयटीचा विध्यार्थी अंकित पाटील यांनीही विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रमास जगदीश पाटील, उमेश काटे,रवींद्र जाधव, यू.डी.पाटील, बापूसिंग पाटील, माजी नगरसेविका शकुंतला पाटील यासह मोठया संख्येने विद्यार्थ्यांसह पालक आणि समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी विजयसिंग पाटील, रणजित पाटील, प्रवीण पाटील, गुलाब पाटील, दीपेन परमार, चेतन राजपूत, अनिल पाटील, नरेंद्रसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर पाटील, अजय पाटील, भरातसिंग पाटील, राजू परदेशी, अतुल राजपूत, विलास पाटील, जितेंद्र राजपूत, भरतसिंग पाटील, गोटू राजपूत, कुणाल राजपूत, प्रदीप राजपुत, अमोल राजपूत, मुकेश राजपूत यासह राजपूत एकता मंच सदस्यांनी परिश्रम घेतले.