सत्तर जेष्ठांचा वाढदिवस केला साजरा

0

सांगवी : पन्नास ते साठ वर्षांपुर्वी सर्वसामान्य कुटुंबात जन्मदिन तिथी वार तारीख लिहिण्याचे विशेष महत्व नव्हते. तर या बाबीकडे त्यावेळी विशेष गांभीर्याने घेतले जात नसायचे. अशिक्षितपणामुळे कष्टकरी समाज, मध्यमवर्गीय समाजात तर खर्‍या जन्म तारखेची वानवाच म्हणावी लागेल. अशा जन्म तारखेच्या घोळात सध्याची एक जेष्ठ पिढीच वंचित राहिली असल्यास नवल नसावे. त्यासाठी स्थानिक नगरसेवक संतोष कांबळे, हर्षल ढोरे, माई ढोरे, शारदा सोनवणे, सिनेट सदस्य संतोष ढोरे, तृप्ती कांबळे, घनशाम कांबळे, तुकाराम भुमकर यांनी उपस्थित होते. फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन,व नगरसेवक संतोष कांबळे यांच्या सहकार्याने फटाक्यांच्या आतषबाजीत सत्तर जेष्ठ नागरीकांच्या हातुन केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला. तर सत्तर जणांना फेटा,शाल श्रीफळ देवुन अभिष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव कांबळे यांनी केले.