सत्ताधार्‍यांकडून खोटी आश्‍वासने देउन दिशाभूल

0

एरंडोल । केंद्र सरकारने निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने देवून सत्ता प्राप्त केली, मात्र तीन वर्षाच्या कारकिर्दीत कोणतेही आश्वासन पूर्ण न करता मतदाराची दिशाभूल करून विश्वासघात केला असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनात म्हटल्याप्रमाणे, तीन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सत्तारूढ भाजपने मतदारांना खोटी आश्वासने देवून सत्ता प्राप्त केली. मात्र कोणतेही आश्वासन तीन वर्षात पूर्ण केलेले नाही.

केंद्र सरकारच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन
पेट्रोल व डिझेलच्या दारात मोठी वाढ झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जनधन योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे बँकेत खाते उघडण्यात आले मात्र त्याचा कोणताही लाभ लाभार्थ्याला झालेला नाही. शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणावर वीज मिळू शकलेली नाही, कृषी मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. नोटाबंदी करून सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरण्यात आले. काळा पैसा शोधण्यात सरकारला अपयश आले आहे. खोटी आश्वासन देवून मतदारांची दिशाभूल करून सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारचा निषेध निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदन देताना यांची होती उपस्थिती
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, तालुकाध्यक्ष विजय महाजन, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, शहराध्यक्ष संजय पाटील, हिम्मत पाटील, सुरेश पवार, उमेश पाटील, संजय कलाल, शेख सांडू शेख मोहम्मद, सुनील शेलार, दंगल पाटील, बबन वंजारी, प्रा.आर.एस.पाटील, इम्रान सय्यद, पांडुरंग महाजन, प्रा.संजय पाटील, राधेश्याम चौधरी, अजबराव पाटील, नगरसेवक योगेश महाजन यांचेसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.