सत्ताधार्‍यांच्या मनमानीविरोधात जनआधारचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

0

पालिका प्रशासन दबावाखाली ; झोपडपट्टी धारकांना पर्यायी जागा द्या व मगच अतिक्रमण हटवण्याची मागणी

भुसावळ- सत्तेवर आलेल्या भाजपा पदाधिकार्‍यांनी शहराचा दिड वर्षात कुठलाही विकास केलेला नाही, अमृत योजनेचे काम शहरात सुरू असले तरी ते नियमबाह्यपणे सुरू असून या योजनेत मोठा घोटाळा असल्याचा आरोप जनआधारचे गटनेता उल्हास पगारे यांनी करीत सत्ताधार्‍यांच्या हुकूमशाही विरोधात 18 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण छेडणार असल्याचे सांगितले. रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्टी धारकांना हटवण्यापूर्वी त्यांना पालिका प्रशासनाने जागा द्यावी व नंतरच झोपडीचे अतिक्रमण हटवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यांची होती उपस्थीती
पत्रकार परीषदेला जगन सोनवणे, नितीन धांडे, आशिक खान शेरखान, सिकंदर खान, सचिन पाटील, प्रदीप देशमुख, दुर्गेश ठाकूर, राहुल बोरसे, निखील भालेराव आदींची उपस्थिती होती.