जमात-ए-इस्लामच्या जनजागृती मोहिमेतील सूर
पिंपरी-चिंचवड : सत्ताधारी शासनाबद्दल नागरिकांच्या मनात एका प्रकारचे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हे वातावरण बदलण्यासाठी जमात-ए-इस्लामचे कार्यकर्ते राज्यातील सर्व जनतेपर्यंत जाऊन त्यांच्यासोबत मानवी संवेदनांचे नाते तयार करण्यात येईल. जनतेत निर्माण झालेली भीती, निराशा आणि द्वेषभावना यांचा विनाश करण्यासाठी जनजागरण केले जाईल, अशी प्रतिज्ञा जमात-ए-इस्लामी महाराष्ट्र पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने करण्यात आली.यावेळी जमात-ए-इस्लाम महाराष्ट्रचे सदस्य मुहम्मद अस्लम गाजी, मराठा सेवा संघाचे प्रवक्ता गंगाधर बनबरे, आकुर्डी गुरुद्वाराचे ग्यानी ओमवीरसिंगजी, जीवनविद्या मिशनचे नामधारक विश्वनाथ कामत आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संत साहित्य व इस्लामी विचारवंत डॉ. सय्यद रफिक (पारनेरकर) उपस्थित होते.
महाविद्यालयांमध्ये जगजागृती फेरी
शांतीशिवाय कोणाची प्रगती होत नाही. त्यामुळे समाजात शांती नांदावी, एकमेकांबद्दल आदर वाढावा, सहिष्णुता नांदावी, समाजातील प्रत्येक घटकाची प्रगती व्हावी, एकमेकांबद्दल आदरभाव, प्रेम वाढावे यासाठी जमाअत-ए-इस्लामी हिन्द महाराष्ट्र या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने 12 ते 21 जानेवारी दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतंर्गत विविध महाविद्यालये, रुग्णालये, जनजागृती रॅली काढण्यात आल्या.
विकास केवळ बोलण्यापुरताच
विकास फक्त शब्दात राहिला आहे. जमात-ए-इस्लामी हिंदच्या मतानुसार, देशाचा विकास त्याचवेळी होऊ शकतो, ज्यावेळी देशात शिक्षा, रोजगार, न्याय आणि जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन सर्वाना समाजात सामान संधी उपलब्ध होईल. समाजाने एकत्र यायला हवे. त्यासाठी जमात-ए-इस्लामी महाराष्ट्रने एक कार्यक्रम आखला असून या अंतर्गत सात गट तयार करण्यात आले आहेत. हे गट राज्यभर निश्चित करून दिलेल्या भागात जाऊन इस्लाम शांती आणि विकासाचा संदेश देणार आहेत, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.