सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती; धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक

0

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. शपथविधीवेळीच विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पावसाळी अधिवेशनासाठी बैठक बोलावली आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा गटनेता आमदार विजय वडेट्टीवार, शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, सपाचे नेते आमदार अबु आझमी, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार कपिल पाटील, आमदार भास्करराव जाधव, आमदार हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे, आमदार रामहरी रुपनवार उपस्थित आहेत. विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.