पिंपरी चिंचवड : खासगी वाटाघाटीने जागा ताब्यात घेण्याप्रकरणी नगरसेवक चोर असल्याचा आरोप सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्यांवरून महापालिका सभागृहात चांगलेच वादंग उठले. कोणते नगरसेवक चोर आहेत त्यांची नावे जाहीर करा. अन्यता बेताल वक्तव्य करणार्या एकनाथ पवार यांच्या तोंडाला भर चौकात काळे फासणार असा इशारा माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे या होत्या. सभेच्या सुरूवातीलाच माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पक्षनेते एकनाथ पवार यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. आजी-माजी नगरसेवकांना चोर म्हणणार्या एकनाथ पवार यांच्या तोंडाला भर चौकात काळे फासणार असा इशारा दत्ता साने यांनी दिला. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी देखील एकनाथ पवार यांचा निषेध व्यक्त केला.