भाजप-शिवसेना सत्ता स्थापनेला काहीच अडचण नाही: उद्धव ठाकरे
मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आणि महायुतीला बहुमत मिळत आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, भाजप-सेनेच्या सत्ता स्थापनेला काहीही अडचण नसल्याचे सांगत, पुन्हा भाजप-सेना सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री कोणाचा होणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याबाबत देखील त्यांनी खुलासा केला. युतीचा फॉर्म्युला ५०-५० चा ठरला होता, पण तरीही भाजपने आम्हाला कमी जागा दिली. भाजपने आम्हाला समजून घ्या असे सांगत कमी जागा घेण्याची विनंती केली. त्यामुळे आम्ही ते मान्य करत निवडूक लढविली. परंतु आता आम्ही माघार घेणार नसून ५०-५० चा फॉर्म्युल्याबाबत आठवण करून देऊ असा इशारा देत मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे.
जनतेने दिलेला कौल पाहून लोकशाही जिवंत आहे असे सांगत जनतेचे आभार मानले.