नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दरम्यान कॉंग्रेस आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. थोड्याच वेळात कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे त्यापूर्वी काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी कॉंग्रेस सत्तेत आल्यास पहिल्याच दिवशी राफेल डीलची चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली. याचा समावेश काँग्रेसने जाहीरनाम्यात केल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राफेल डीलचा मुद्दा उपस्थित केला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा थोड्याच वेळात प्रसिद्ध होणार आहे. ‘जन आवाज’या नावाने जाहीरनामा आहे.
कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक लोकानुनयी घोषणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. 11 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातले मतदान सुरू होईल. त्यामुळे या जाहीरनाम्यात नेमकी काय काय आश्वासनं देण्यात आली आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.