सत्तेसाठी चालती भाजपची वाट !

0

भाजपची सत्ता असल्याने सत्ता भोगण्यासाठी अनेकांनी केला भाजपशी घरोबा

राज्यातील एकापाठोपाठ एक गावपातळीपासून थेट शहरपातळीवरील निवडणुकांमध्रे भाजपाला यश येत आहे. यापूर्वी भाजप, जनसंघ म्हटला की, तो फारतर शहरात दिसायचा. आता गावपातळीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. ही नरेंद्र मोदींची किमयाच म्हणावी लागेल. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत 26 पैकी 13 महापालिकांमध्ये महापौर भाजपचे झाले आहेत. उरल्या सुरल्या महापालिका देखील काबीज करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यादृष्टीने भाजपाने धुळे शहरासह जिल्ह्यात पक्ष मजबुतीकरणासाठी प्ररत्न सुरु केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत नाराज असलेल्रांना जवळ करण्याची मोहीम भाजपाकडून सुरू आहे. काहींना पुष्पमाळा गळ्यात टाकून दिल्या, काहींना टाकण्यात येणार आहेत तर काहींच्या गळ्याचे माप घेणे चाललंय. जिल्ह्यातील सत्ता असलेल्या पक्षांच्या ’एक ना धड भाराभर चिंध्या’ झाल्याचे चित्र आहे. धुळे जिल्ह्यात धुळे ग्रामीण, साक्री, शिरपूर तालुक्यात काँग्रेसची सत्ता आहे. परंतु राज्रात तसेच केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे पाहिजे तसा विकास गेल्या तीन वर्षात साधाला गेला नाहीय. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने, सूतगिरण्या यासारखे मोठ मोठे प्रकल्प बंद पडले आहेत.

दरम्यान भाजपाची घोडदौड पाहता भविष्रात सत्ता बदलाचे चित्र काही दिसत नाही. आशा स्थितीत बंद पडलेल्या प्रकल्पांना राज्यसरकार कडून संजीवनी मिळेल या आशेने का होईन भाजपच्या  वाटेवर  जाणार्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. राला सत्तेसाठी चालती भाजपची वाट असेच म्हणावे लागेल. भाजपाने 2019 च्रा निवडणुकीला दोन वर्ष शिल्लक असतांनाच निवडणुकीची आतापासूनच तरारी सुरु केली आहे. त्रादृष्टीने भाजपाने धुळे जिल्हा भाजपमय करण्यासाठी कंबर कसली आहे. मुळात सत्तेत राहिलेला काँग्रेसपक्ष असो की, राष्ट्रवादी त्यांचे नेते सत्तेशिवाय जगूच शकत नाहीत. याचा अनुभव 1977 च्या निवडणुकीनंतर व 1994-95 नंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर आला होता. तशीच काहीशी परिस्थिती सध्या दिसत आहे. मात्र, यावेळी भाजपनेते अत्यंत सावधपणे खेळी खेळत आहेत. निवडून येण्यासाठी व डोके मोजण्यासाठी आयारामांचा उपयोग करून घेतात. तिच खेळी धुळे जिल्ह्यातही खेळली जाईल असे जाणकारांचे मत आहे. राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या धुळे महापालिका सोबत येणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने पाऊले उचलली असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेत भाजपच्रा 122 पैकी 23 आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीमधून आलेले आयाराम आहेत. असे असले तरी आरारामांना मंत्रीपद दिलेले नाही. शिवसेना मित्रपक्ष असला तरी आमचा ‘शत्रूपक्ष’ भाजप नंबर 1 आहे, असे शिवसेना नेते म्हणत आहेत. विशेष म्हणजे धुळ्रातील शिवसेनेच्या मातब्बर नेत्या शिवआरोग्य आणि महिला आघाडीच्या प्रमुख जबाबदारी असलेल्या डॉ.माधुरी बाफना रांनी भाजपात प्रवेश केला. यावरूनच मित्र पक्षाचे दुखणे उघड होते.

एकंदरीत धुळे जिल्हा भाजपमय करण्याच्या दिशेने सकरात्मक दृष्टिकोन ठेऊन भाजपा काम करत आहे. धुळे शहराच्या महापालिकेवर राज्य प्रस्थापित करता यावे म्हणून भाजपाने आपली दारे उघडी केली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक रांगेने भाजपमध्ये चालले आहेत. पाठोपाठ शिवसेना,काँगेस ही रडारवर असल्याचे चित्र आहे. हा सध्यातरी फुगवटा दिसत असला तरी भाजपवाले या आयारामाचा उपयोग नेहमीप्रमाणे केवळ सत्ता मिळवण्यासाठीच करून घेतील का? हे निर्धारित वेळेवरच स्पष्ट होईल.