नवी दिल्ली: राज्यसभेत आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले आहे. या विधेयकाला राज्यसभेत विरोध होत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयक मांडले तसेच चर्चेला उत्तर दिले. या विधेयकाला शिवसेनेने राज्यसभेत विरोध केला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधेयकाविरोधात भाष्य करत विधेयकाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही म्हटले जात असल्याचे सांगत भाजपला टोला लगावला. यावर गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिले. सत्तेसाठी लोक कसे कसे रंग बदलतात, असे म्हणत अमित शहा यांनी शिवसेनेला टोला लगावला. सत्तेसाठी शिवसेनेने आपला अजेंडा सोडला असा टोलाही अमित शहा यांनी शिवसेनेत राज्यसभेत लगावला.
लोकसभेत या विधेयकाला समर्थन करणाऱ्या शिवसेनेने एका रात्रीत राज्यसभेत विधेयकाला विरोध केला. शिवसेना कोणाच्या दबावात आली? असा प्रश्न ही अमित शहा यांनी लगावला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत या विधेयकावर बोलताना कोणीही आम्हाला देशभक्ती शिकवू नये. तुम्ही ज्या शाळेत शिकले आहे त्या शाळेचे आम्ही मुख्याध्यापक होते अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.