भुसावळ। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने समाजातील अनिष्ट प्रथांवर टीका करीत प्रबोधन करणार्या सत्यपाल महाराजांवर मुंबईत हल्ला झाला होता. या हल्ल्याची चौकशी करावी, अशी मागणी अंनिसने प्रांताधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्यात अनिष्ट रुढी परंपरांविरुध्द समाज प्रबोधन करणार्या सत्यपाल महाराजांवर मुंबई येथील एका कार्यक्रमात भ्याड हल्ला करण्यात आला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून यामुळे समाजातून तीव्र भावना व्यक्त होत आहे.
निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
या हल्ल्याची चौकशी करुन त्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी अंनिसचे अरुण दामोदर, चंद्रकांत चौधरी, सागर बहिरुणे, अंजना निरभवणे, शाम वासनिक, डॉ. देवानंद उबाळे, योगेश म्हस्के, साहेबराव केदारेंनी केली आहे.