धुळे । श्रीमंत कोकाटे आणि सत्यपाल महाराज यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देऊन केली. या घटनांमुळे जनप्रबोधन करणार्या लोकांना धोका निर्माण होत आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शाहू-फूले-आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रासह जगभरात करणार्या व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांच्यावर तसेच सत्यपाल महाराज यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून याप्रकाराचा तपास करुन हल्लेखोेरांना कठोर शासन करा तसेच या हल्ल्यामागील मूळसुत्रधार शोधून काढावेत. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर संभाजी ब्रिगेडच्या हेमंत भडक, मनोहर पाटील, शालिक बोरसे,भूषण बागुल,विक्की रवंदळ,हिरालाल बोरसे, एम.आर.जाधव यांच्यासह पदाधिकार्यांची नावे आहेत.