सत्यवचन, सत्कृत्य आणि सदऊवर्तन व्यक्तिगत आणि पारीवारिक शांती- समृद्धीची गुरुकिल्ली -शंतनु पटवे

0

फैजपूर- प्रत्येक व्यक्ती जीवनात असंख्य समस्या आणि त्रासातून जीवन कंठत असतो. सर्व समस्यांचे मूळ आपल्या वर्तनात असून स्वभावाला औषध ज्ञान आहे. वर्तनाचे नियम माहिती करून आपण व्यक्ती, परीवार, समाज, राष्ट्र आणि विश्व कल्याण साधू शकतो, असे प्रतिपादन मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथील साधक शंतनु पटवे यांनी फैजपूर येथील श्रीकृष्ण नगर मधील व्याख्यानमालेत केले. लोणावळा येथील स्वामी विज्ञानानंद स्थापित प्रयोग केंद्रामार्फत दिनांक 19 ते 23 नोव्हेंबर 2018 दरम्यान राष्ट्रकल्याण अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबिविले जात आहे. या निम्मित विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. श्रीकृष्ण नगर रहिवाश्यांनी पुढाकार घेऊन परीवाराचे सुख आणि शांती याविषयावर व्याख्यान आयोजित केले. त्यात उज्जला भिरुड, किरंगे, स्मिता झांबरे, डॉ.गिरीष पाटील आणि श्री शंतनु पटवे यांना आमंत्रित करण्यात आले.

आनंदमय आयुष्याबाबत पटवे यांनी केले विवेचन
व्याख्यानात पटवे यांनी परीवारातील सुखाचे शत्रू, समस्या आणि निराकरण यावर सविस्तर विवेचन केले. त्यांनी असंख्य उदाहरणे देऊन आपले आयुष्य किती आनंदमय आहे हे ओघवत्या शब्दात पटवून दिले. स्वामी विज्ञानानंद यांच्या 25 व्या कृतज्ञता वर्षानिमित्त त्यांच्या विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील अजोड संशोधनाला समाजापर्यंत पोहचविणे सुरू आहे. पाच धर्म, 28 विज्ञाशाखा आणि 250 पुस्तकांच्या माध्यमातून लहानग्यांपासून जेष्ठांपर्यंत अनेक विषयांवर तीन दिवशीय शिबिरे लोणावळा येथे सुरू असतात.