नवी दिल्ली: मध्ये प्रदेशमध्ये कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर २२ आमदारांनी सामुहिक राजीनामे दिले. अल्पमतात आलेले कमलनाथ सरकार आज १५ महिन्यातच कोसळले. तब्बल १५ वर्षानंतर मध्य प्रदेशात कॉंग्रेस सरकार स्थापन झाले होते, मात्र ते १५ महिन्यातच कोसळले. दरम्यान या सर्व घटना ज्यांच्यामुळे घडल्या त्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विट करून ज्योतिरादित्य यांनी आनंद व्यक्त केला. राज्यातील जनतेचा आज विजय झाला. मला नेहमीच वाटते की, राजकारण हे जनतेच्या सेवेचे माध्यम असायला हवे. मात्र मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार यापासून दूर गेले होते. सत्याचा पुन्हा विजय झाल्याचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे.