सत्या त्रिपाठी युनोच्या असिस्टंट सेक्रेटरी जनरलपदी

0

न्यूयॉर्क: सत्या एस. त्रिपाठी विकास आणि पर्यावरण तज्ज्ञ यांची संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) असिस्टंट सेक्रेटरी जनरलपदी नियुक्ती करण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या वरिष्ठ पातळीवर निवड होणारे त्रिपाठी तिसरे भारतीय ठरले आहेत.

त्रिपाठी हे युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडातील शाश्वत विकास, मानव अधिकार, लोकशाही आणि कायदेशीर बाबींसंदर्भात कार्यरत आहे.
यूएनईपीमध्ये 2017 पासून 2030 शाश्वत विकासाच्या अजेंड्यावर वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्रिपाठी यांच्या आधी दोन भारतीय यूएनमध्ये मोठी पदे भूषवित आहेत. त्यापैकी अतुल खरे यूएनच्या कार्यकारी सेवा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार पाहत आहेत.