सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष

सत्या नाडेला यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला हे अध्यक्ष झाले आहेत. ते जॉन थॉमसन यांची जागा घेणार आहेत. थॉमसन यांना २०१४ मध्ये अध्यक्ष बनविण्यात आले होते. त्या आधी ते कंपनीच्या संचालक मंडळावर प्रमुख स्वतंत्र संचालक होते. नाडेला यांना देखील २०१४ मध्येच मायक्रोस़ॉफ्टचा सीईओ बनविण्यात आले होते. तेव्हा कंपनी मोठ्या संकटातून जात होती. मायक्रोसॉफ्टचे अनेक प्रयोग फसले होते. यामध्ये नोकिया-विंडोज ओएसचा देखील समावेश होता. नाडेला यांनी या संकटातून कंपनीला बाहेरच काढले नाही तर त्यांनी क्लाऊड कॉम्प्युटिंग, मोबाईल अॅप्लिकेशन आणि आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सवर लक्ष वळविले आणि पारंपरिक सॉफ्टवेअर निर्मितीलाही चांगले दिवस दाखविले.