सत्रासेन गावातून 40 हजारांचे सागवान लाकूड जप्त

0

यावल गस्ती पथकाची कारवाई ; संशयीत आरोपी पसार

यावल- तालुक्यातील सत्रासेन गावातील शशिकांत भगवान मिस्तरी व सुनील नरसिंग पावरा याच्या घरातून विनापरवाना बाळगण्यात आलेला सागवानी लाकडांचा 40 हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींच्या घरातून सागवानी माल, सागवान नग 13, साग दुशेर आदी साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई यावल उपवनसंरक्षक प्रकाश मोरणकर, गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, विभागीय वनअधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.