सत्र न्यायालयात सोयीसुविधांचा बोजवारा

0

कडूस । राजगुरुनगर येथील सत्र न्यायालयात सोयीसुविधांचा बोजवारा उडाला असून खेड बार असोसिएशनच्या विनंतीनुसार आमदार सुरेश गोरे यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, सदस्या वैशाली जाधव, सदस्य भगवान पोखरकर, अमर कांबळे, अंकुश राक्षे, नगरसेवक शंकर राक्षे, राहुल आढारी, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष मारूती सातकर, खेड बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, अ‍ॅड. पोपटराव तांबे, अ‍ॅड. गोरक्षनाथ शिंदे, अ‍ॅड. राहुल वाडेकर, अ‍ॅड. कोंडीभाऊ कोबल, अ‍ॅड. संदिप मलघे उपस्थित होते.

आमदारांपुढे वाचला समस्यांचा पाढा
राजगुरुनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात जवळजवळ बारा न्यायाधीश कामकाज पाहत असून खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर पक्षकार व जिल्ह्यातील वकील न्यायालयीन कामकाजासाठी येत असतात. मात्र सत्र न्यायालयातील इमारतीत सोयीसुविधांचा बोजवारा उडाला असून खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल राक्षे, उपाध्यक्षा अ‍ॅड. अश्विनी मडके यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यकारिणीने आमदार सुरेश गोरे यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला.

अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना
ग्रंथालय, पार्किंग, टॉयलेट, कँटीन, ड्रेनेज, सत्र न्यायालयातील लोखंडी रेलिंग तसेच न्यायाधीश निवासासाठी शासकीय जागेची मागणी केली. यावर आमदार सुरेश गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व खेड बार असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह संपुर्ण न्यायालय इमारत व परिसराची पाहणी करून ताबडतोब अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. खासदार शिवाजीराव आढळराव यांनी यापूर्वी सत्र न्यायालयास भेट देऊन ग्रंथालयासाठी निधी दिल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांनी सांगितले.