चाळीसगाव – तालुक्यातील रांजणगाव येथे सदगुरु माधवगिरी महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी ११ ते १२ नोव्हेंबर रोजी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी हजारो भाविकांनी समाधीचे दर्शन घेत आयोजित किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
याबाबतची आख्यायिका अशी की जुन्या काळात रांजणगांव परिसरात घनदाट जंगल होते. ह्याच दंडक अरण्यात वाटमारी केली जात असत यात रांजण भरली जायचीत आजही या भागात भली मोठी रांजणे नजरेस पडतांना दिसून येतात त्यामुळेच या गावाचे नाव रांजणगाव हे नाव पडले असे पुर्वीचे लोक उल्लेख करतांना सांगतात,पूर्वीच्या काळात गाव फाट्याजवळ वास्तव्यास होते. नाथ पंथीय महाराज यात्रा भ्रमण करत जात असतांना थांबले असता त्यातील एका महाराजांनी उपासना, पूजा करायचे ठरवले याच ठिकाणी त्यांनी आपली सेवारत करीत जिवंत समाधी घेतली तेव्हापासून कार्तिक शुद्ध चतुर्थीला रांजणगांव येथे येथे श्री सदगुरू माधवगिरी महाराजांची यात्रा भरते. संपुर्ण गावचे हे श्रद्धा स्थान असून दूरवरुन भाविक दर्शनासाठी येतात व पावन समाधीचे दर्शन घेतल्यास आशीर्वादरुपी लाभ मिळतो देतात अशी भाविकांची श्रद्धा आहे .
श्री सदगुरु माधवगिरी महाराज यांनी सुमारे ४५९ वर्षापूर्वी शके १४९० कार्तिक शुद्ध चतुर्थी रोजी जिवंत समाधी घेतली असून सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहात यात्रा भरत असते,यात्रोत्सवाच्या निमित्ताने बाहेरगावी स्थायिक झालेले ग्रामस्थ एकत्र आल्याने यात्रेस वेगळे स्वरुप प्राप्त झालेले दिसून आले,सकाळी गावातून ठिकठिकाणाहून फुल चादर काढण्यात आली यात सायंकाळी वाणी गल्ली परिसरातील भाविकांच्या वतीने मोठ्या उत्साहात व ढोलताशांच्या गजरात भाविकांची चादर काढण्यात आली यात परिसरातील वृद्ध मंडळीसह महिला भगीनींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला.
कावड मिरवणुकीचे आकर्षण-अनील चव्हाण
पूज्य माधव गिरि महाराजांच्या समाधी साठी भाविक वालझिरी तीर्थक्षेत्र येथून कावड मधे वालझिरी डोहातून तीर्थ रुपी पाणी आणतात ही कावड मिरवणुकीचे गावातून रात्री वाजत गाजत स्वागत केले जाते त्यानंतर या तिर्थाने माधव गिरि महाराजांच्या समाधी ला आंघोळ घातली जाते अशी भावनिक नाते असलेल्या कावड मिरवणुकीचे सर्वांना आकर्षण आहे त्यातच कीर्तन सप्ताह व तगत राव मिरवणूक लोककला तनाश्यांचे दोन दिवस होणारे कार्यक्रम यामुळे या जत्रेचे परिसरात मोठी उत्सुकता असते अशी भावना येथील रहिवाशी व व्यवसायानिमित्त नाशिक येथे वास्तव्यास असलेले कर सल्लागार अनिल चव्हाण यांनी जनशक्तिकडे व्यक्त केली.
जलसाक्षरदूत स्वप्निल कोतकर यांनी वाढविली फुल चादर
यावेळी चाळीसगांव चे जल साक्षर दूत स्वप्नील कोतकर व मित्र मंडळ सर्वश्री संदीप पाटे,संदीप जोशी,समीर चव्हाण,नितीन पाटे,विवेक धामणे,मयुर पाटे,किशोर पाटे,गोविंदा येवले,योगेश पाटे,सचिन येवले,किरण येवले,निखिल पाटे,प्रशांत येवले,निलेश येवले,प्रदीप सोनवणे,तुषार पाटे,कल्पेश पाटे,सचिन सोनार,मंगेश कोतकर आदी भाविकांच्या वतीने फुलचादरीचे आयोजन करण्यात आले होते तदनंतर पालखीचे दर्शन घेण्यात येवून परिसरात प्रसादाचे वाटप करण्यात आले.