शिरूर । रयत शिक्षण संस्थेच्या (सातारा) सर्वसाधारण मंडळाच्या सदस्यपदी जाकिरखान शहिदखान पठाण यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र त्यांना रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रियमंत्री शरद पवार यांनी दिले. शिरूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तसेच रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत शहिदखान पठाण यांचे ते पुत्र. पवार यांचे एकनिष्ठ म्हणून पठाण घराण्याची जिल्ह्यात ओळख आहे.
तळागाळातील उपेक्षित घटकांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वडिलांप्रमाणेच काम करून त्यांचा वारसा पुढे चालवणार असल्याचे निवडीनंतर पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच नवनिर्वाचीत रयत शिक्षण संस्थेचे सर्वसाधारण मंडळाचे सदस्य जाकिरखान पठाण यांनी सांगितले.