यवत । भांडगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत आमदार राहुल कुल गटाच्या दत्तात्रय एकनाथ दोरगे यांची ग्रामपंचायत सदस्य पदी बिनविरोध निवड झाली. भांडगाव गणाचे पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे यांची ग्रामपंचायत सदस्यपदाची जागा रिक्त झाल्याने तेथे पोटनिवडणूक लागली होती.
भांडगाव ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुका मोठ्या चुरशीने झाल्याचा अजून पर्यंतच्या अनुभव आहे.मात्र गावातील सर्व राजकीय गटांच्या पुढार्यांनी एकत्र येत दत्तात्रय दोरगे यांना बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला. यामुळे पोटनिवडणुकीत केवळ दत्तात्रय दोरगे यांचा अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल दोरगे यांचा आमदार राहुल कुल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लक्ष्मण काटकर, लक्ष्मण दोरगे, दादा टेळे, विजय दोरगे, श्याम कापरे, दिगंबर जाधव, रवी जाधव, समीर खळदकर, राहुल खळदकर उपस्थित होते.