सदस्यांनीच ठोकले नगरदेवळा ग्रामपंचायतीला कुलूप

0

नगरदेवळा । नगरदेवळा गृप ग्रामपंचायत ही पाचोरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते. या ग्रामपंचायतील सदस्यांनी 14 वित्त आयोगानुसार गैरव्यवहारबाबत अग्नावती चौपाटीवर उपोषण केले होते, मात्र त्यावेळी पाचोरा पंचायत समिती गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी चौकशी करून त्वरीत निर्णय मार्गी लागण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीत झालेल्या सभेत वाद निर्माण झाल्यानंतर बीडीओंनी आपले आश्‍वासन पुर्ण न केल्यामुळे आज ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामपंचाय सदस्यांनीच कुलुप ठोकल्याचा प्रकार झाला आहे. नगरदेवळा येथे झालेल्या कारभाराबाबत पाचोरा तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली होती. ग्रामपंचायत च्या सभेत 14 सदस्य व सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यात याच विषयाच्या मुद्द्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर खडाजंगी झाली होती.

मी शासकीय कामानिमित्त जळगावी जात असतांना मला कुलूप ठोकण्याची बातमी समजली असता मी त्वरीत माघारी परत आलो मी वेळोवेळी सर्व सदस्यांना शासकीय नियमाच्या अधीन खर्चाच्या बिलासहित व मुल्यांकनासहित हिशोब दिला आहे. मात्र सदस्य समाधानी नाहीत तसेच महिला ग्रामपंचायत सदस्य असलेमुळे त्या न येता त्यांचे पतीच वेळोवेळी मला वेठीस धरत आहे. मी सर्व कामे शासकीय नियमाच्या आधारे केले आहेत.
– ए.एम.राठोड, ग्रा.वि. अधिकारी

मी सदरच्या घटनेची सर्व माहिती घेतली असून ग्रा. वि. अधिकार्‍यांना ताबडतोब कार्यालयात पाठवले आहे. व सर्व सदस्यांना विश्‍वासात घेऊन सविस्तर माहिती द्यावी व त्यांचे समाधान करावे व कार्यालयाला कुलूप न ठोकता ग्रा.प. सदस्यांनी शासनाला सहकार्य करावे.
– गणेश चौधरी, बीडीओ

नगरदेवळा ग्रा.पं. सदस्यांनी आजपर्यंत मी लोकप्रतिनिधी असून देखील माझ्यापर्यंत सदर विषय मांडला नाही त्यांनी माझ्याकडे तक्रार केली असती तर मी स्वत: बी.डी.ओ, सी.ओ. किंवा ग्रामविकास मंर्त्र्यांपर्यंत समस्या नेऊन त्याचे निराकरण केले असते. मात्र ग्रा.पं. ला कुलूप लावून कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन मी करतो. आपल्या सर्व समस्या सोडण्यासाठी मी बांधिल आहे. आताताईपणा कोणी करू नये. चर्चेतून मार्ग निघेल.
– आमदार किशोर पाटील, पाचोरा