सदाशिव पेठेत अवतरली शिर्डी

0

पुणे । फुलांनी सजविलेल्या पालखीसोबत साईबाबा की जय… चा जयघोष करीत साईबाबांची पालखी सदाशिव पेठेतून वाजत गाजत काढण्यात आली होती. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत पुणेकरांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी साईबाबांच्या वेशातील कलाकार पालखीत सहभागी झाले होते.

सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळतर्फे शिर्डी साईमंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. त्यामुळे शिर्डी साईमंदिरामधील दिनक्रम मंडळातर्फे विधीवत आचरणात आणला जात आहे. साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कसबा गणपतीचे विश्‍वस्त निलेश वकील, तांबडी जोगेश्‍वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, भाऊरंगारी गणपती मंडळाचे राजेंद्र गुप्ता, सुरज रेणुसे, बाळासाहेब निकम, संदीप राजापूरकर, मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, उपाध्यक्ष अरुण गवळे, कार्याध्यक्ष संग्रामसिंह शिंदे आदी उपस्थित होते. छत्रपती राजाराम मंडळाच्या येथून पालखी मार्गक्रमण करीत लज्जत हॉटेल, ब्राह्मण मंगल कार्यालय आणि ज्ञान प्रबोधिनीमार्गे पुन्हा मंडपात विसावली. अश्‍वराज बँडने यावेळी वादन केले. 75 फूट उंचीचा देखावा मंडळातर्फे तयार करण्यात आला होता.