सदोष पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीतून पाठ्यपुस्तक मंडळाने जोपासला प्रामाणिकपणा

0

सातवीच्या मराठी पुस्तकात व्याकरणाच्या चुकाच चुका ; प्र.ह.दलाल यांची माहिती

भुसावळ- मराठी माध्यमाच्या इयत्ता सातवीच्या बालभारती पुस्तकात क्रियाविशेषण व क्रियाविशेषण अव्यय याबाबत चुकीची माहिती देऊन पाठ्यपुस्तक मंडळाने पाठयपुस्तके निर्मितीचा वसा प्रमाणिकपणे जोपासला असल्याचे पत्रक मराठी विषयाचे अभ्यासक प्र.ह.दलाल यांनी प्रसिद्धीस दिले आहे यापूर्वीदेखील पाठ्यपुस्तक मंडळाकडून अशा चुका झाल्या आहेत. या संदर्भात पत्रव्यवहार करून ेखील चुका दुरूस्त्या होत नसल्याची बाब समोर येत आहे. बालभारती पुस्तकातील पान क्रमांक 17 वर एक परीच्छेद दिला असून . त्यापुढेच क्रिया विशेषण अव्यये वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात असे चुकीचे व अपूर्ण विधान केले आहे. त्यापुढेच लक्षात ठेवा असे लाल ठळक अक्षरात विशेषणे नाम व सर्वनामांबद्दल अधिक माहिती देतात तर क्रियाविशेषण अव्यव क्रियापदाबद्दल व्याकरणदृष्ट्या चुकीचे विधान केले आहे. तो मुलगा चांगले खेळतो. या वाक्यात चांगले हे खेळतो या क्रियापदाचे विशेषण आहे. म्हणजे विशेषण हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देते. अशा प्रकारच्या अनेक चुका पुस्तकांमध्ये आढळून येत असल्याचे दलालयांनी कळवले आहे. ाठ्यपुस्तक मंडळाने दुरूस्ती करून संबंधित शाळांना कळवावी कारण केवळ विद्यार्थी, पालकच नव्हे तर शिक्षक आणि तथाकथित तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकही पुस्तकातील छापील माहितीच खरी व अधिकृत समजतात, व्याकरण आधीच क्लीष्ट समजले जाते, त्यात अशा चुकांमुळे ते आणखीन क्लीट होवून विद्यार्थ्यांच्या मनात निष्कारण गोंधळ निर्माण होतो, असे दलाल यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.