रावेर- ज्या व्यक्तीच्या अंतरी अवगुणाचा नाश होवून सदगुण विकसित होतो त्याला नारायण प्राप्ती शक्य होते यासाठी निरंतर साधना, सद्गुरूचे सानिध्य लाभणे गरजेचे आहे. सद्गुरू हेच मनाचे द्वार उघडतात आणि परमेश्वरापर्यंत पोहचविण्याचे काम करीत असतात, असेच महान कार्य पाल येथील प.पू.लक्ष्मण चैतन्य बापुजींनी सद्गुरूरूपी नौकेमध्ये बसवून लाखो चैतन्य साधक परीवारांना भवसिंधू पार होण्याचा मार्ग दाखविला, असे विचार गादीपती श्रध्येय संत श्री गोपाल चैतन्य महाराजांनी तीन दिवसीय नाम जप साधना शिबिराच्या द्वितीय सत्रात साधकांना संबोधीत करताना व्यक्त केले. 25 रोजी संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांची नववी पुण्यतिथी असून यानिमित्त पहाटे पाच वाजेपासून समाधी दर्शन, त्यानंतर सात वाजेला गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या सानिध्यात पादुका पूजन, गुरूदीक्षा, नऊ वाजेपासून उपस्थित संत महंत, महामंडलेश्वरांचा सत्कार तसेच श्रद्धावचन त्यानंतर सत्संग तसेच महाआरती व महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात येणार आहे.