सद्गुरू शंकर महाराज विशेषांकाचे प्रकाशन

0

धनकवडी । श्री शंकर महाराजांच्या जन्मापासून त्यांनी घेतलेल्या संजीवन समाधीपर्यंतच्या कार्याची माहिती मिळू शकणारा आणि भाविकांना उपयोगी पडणारा नोव्हेंबर 2017चा श्री सद्गुरू शंकरमहाराज यांच्या जीवनावरील विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवारी समाधी मठात पार पडले. ‘गुरुतत्त्व’ मासिकातर्फेे मे, 2017पासून हा अंक प्रकाशित होत आहे. पहिल्या अंकापासून श्री दत्तात्रय, नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वती, श्री साईबाबा आणि या अंकात श्री शंकर महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देण्यात आला आहे.

दर महिन्याच्या अंकामध्ये एक अवतारी संताची माहिती व इतर मान्यवरांचे लेख असतात. गुरुतत्व हे एक मार्गदर्शक तत्त्व आहे. जे पृथ्वीच्या उत्पत्तीला होते आज स्थितीला आहे व पुढे पृथ्वीच्या लयापर्यंत राहणार आहे. मार्गदर्शक बदलत राहतात मात्र तत्व एकच असते याच तत्त्वाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘गुरुतत्व’ मासिकाची निर्मिती झाली आहे.

प्रकाशन समारंभास प्रभाकर मोगल, सुरेंद्र वाईकर, विलास पानसरे, सुर्यकांत केळकर, चंद्रकांत सणस, किरण वाईकर, रामलिंग शिवनगे, संतोष जोशी, सुरेंद्र पैठणकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनउदय जोशी यांनी केले.