तेल अविव – आता स्वथःला आईशा म्हणविणार मोक्तादा अल-वलरी त्याचे इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन याच्याशी असलेल्या समलिंगी प्रेमसंबंधांबात लिहिणार आहे. या आत्मचरित्रात सद्दामसोबतच्या नाजूक गोष्टी आईशा उघड करणार असल्यामुळे पुस्तकासंबंधी उत्सुकता ताणली आहे.
सद्दाम हुसेन जगाला क्रूर वंशहत्यारा म्हणून माहित आहे. स्वतःला खूप खंबीर, अनिश्चल समजणारा आणि तशी स्वतःची प्रतिमा जगाला दाखविणारा हा हुकूमशहा भावनिक आणि हळवा प्रेमिक होता, असे आईशा म्हणतोय. आईशा आता ३८ वर्षाचा आहे आणि सद्दाम १४ वर्षांचा असल्याताना हे दोघे एकमेकांना भेटले. तेल अविव पोस्ट नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत हुकूमशहाचे पडद्यामागचे व्यक्तीमत्व उलगडून दाखवताना आईशाने आणखी माहितीही दिली. उदय हुसेन या त्याच्या मुलापेक्षा सद्दाम खूप चांगला होता. तोही अलिशावर प्रेम करायचा आणि वडिलांसोबत संबंध ठेवणारा त्याच्या सोबतही संबंध ठेवतो हे त्याला सुखावायाचे. अशा गुप्त गोष्टीही आत्मचरित्रात उघड होणार आहेत. उदय बायकांसारखा पोशाख करी, मेकअप करी आणि स्वतःला मर्लिन असे संबोधण्यास लावी. त्याने ठार केलेल्या लोकांच्या अंगावरील दागिने तो घालीत असे. विकृत लैंगिक चाळे करीत असे. सद्दाम त्याची संभावना डुक्कर अशी करीत असे. सद्दाम मात्र चांगला होता अशी तुलना आईशा करतो. वादग्रस्त पुस्तक बाजारात आलेले नाही तोच मध्यपुर्वेतील देशांमध्ये त्याच्यावर बंदी आलेली आहे. इस्त्रायली प्रकाशक असल्यामुळे ज्युंनी चालविलेला अपप्रचार असा शिक्काही त्याच्यावर बसला आहे.