सधन शेतकर्‍यांना कर्जमाफी नका

0

मुंबई । ज्या लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशा लाभार्थी शेतकर्‍यांनी स्वत:हून कर्जमाफी नाकारावी असे आवाहन शासनाने केले आहे. याला प्रतिसाद देत अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी कर्जमाफीच्या लाभार्थी यादीतून वगळण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मला निवृत्तीवेतन मिळत असून माझ्या कुटुंबाला कर्जमाफीची आवश्यकता नाही.