सध्या तरी मालिकेवर लक्ष केंद्रित

0

अ‍ॅटिग्वा । सध्या तरी आम्ही वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विचारणा केल्यावरच भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकाविषयी माझे मत मांडेल, असे स्पष्टीकरण कर्णधार विराट कोहलीने दिले आहे. लक्ष केंद्रित केल्याचे कोहलीने म्हटले आहे. वेस्ट इंडिज दौर्‍यापूर्वी अनिल कुंबळेने मुख्य प्रशिक्षकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने वाद निर्माण झाला होता.

बीसीसीआय सध्या नवीन प्रशिक्षकाच्या शोधात असून रवी शास्त्री यांनीदेखील या पदासाठी अर्ज केला आहे. विराट कोहलीने रवी शास्त्रींसाठीच हा खटाटोप केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.

मत जाहीर करणार नाही
प्रशिक्षक निवडीसंदर्भात आणखी प्रश्न विचारल्यानंतर विराट पुढे म्हणाला, बीसीसीआयसमोर आम्ही आमचें मत मांडलें आहे. यावर मी जाहीरपणे भाष्य करू इच्छित नाही. प्रशिक्षक निवडीपेक्षा सध्या वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकण्यावर आमचा भर असेल असे त्याने स्पष्ट केले. मालिकेत आम्ही आघाडीवर आहोत. आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया ही बीसीसीआयच्या अंतर्गत असून आम्ही सध्या त्याकडे लक्ष देणार नाही, असे कोहलीने म्हटले आहे.