पॉर्न इंड्स्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आलेल्या सनी लिओनने आपला सारा भूतकाळ मागे सारून नव्याने सुरुवात केली. सनी बॉलिवूडमध्ये स्वतःच्या हिमतीवर उभीदेखील राहिली. पण सनी लिओनने आता बॉलिवूडमधून टॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लवकरच एका तेलुगू चित्रपटात सनी लिओन झळकणार असून, हा एक पिरिएड ड्रामा चित्रपट आहे. सनी या चित्रपटासाठी तलवारबाजी, घोडेस्वारी शिकत आहे. अॅक्शनपट चित्रपट निवडण्याची इच्छा असल्याचे सनीने म्हटले होते. त्यानुसार हा चित्रपट उत्तम चित्रपटचा असल्याने या चित्रपटाची निवड केली असल्याची माहिती दिली आहे. अद्याप सनीच्या या तेलुगू चित्रपटाचे नाव अजूनही ठरलेले नाही. सनीने 2015 मध्ये आलेल्या ‘डीके’ या कन्नड चित्रपटामध्येही ‘सेसम्मा’ या गाण्यावर नृत्य केले होते. त्यानंतर आता सनी तेलुगू चित्रपटामध्ये झळकणार आहे.