गांधीनगर-आपल्या राजकीय भाषणांमधून विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेलने पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनीची बाजू मांडली आहे. ज्या दृष्टीकोनाने नर्गिस, श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांसारख्या अभिनेत्रींकडे पाहिले जाते त्याच नजरेने सनी लिओनीलाही पाहावे असे हार्दिक पटेलनी म्हटले आहे.
भाजपा म्हणजे ‘सत्ता लालची पार्टी’ असल्याचे आरोप त्यांनी केले. तसेच जर २०१९ मध्ये निवडणुकांत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्यानंतर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत असे ते म्हणाले. यामागे काय कारण असू शकते अशी विचारणा केली असता पटेल म्हणाले, ज्या पद्दतीने कर्नाटक निवडणुकांनंतर राज्यपालांनी बहुमत असतानाही कांग्रेस आणि जेडीएसला सत्तास्थापनेची संधी न देता भाजपाला बोलावलं त्यावरुन देशात घटना संपवण्याची तयारी सुरू असल्याचे ते म्हणाले.