मुंबई: गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे केरळ मधील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशभरातून मदत मिळत आहे. दरम्यान अभिनेत्री सनी लिओनीने केरळ पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयांची मदत केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मात्र सनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलीली नाही.
पूरग्रस्त केरळला या परिस्थीतीतून बाहेर काढण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन, शाहरूख खान जॅकलिन फर्नांडिससारखे कलाकारांनी पुरग्रस्तांच्या मदतीकरता आपले योगदान दिले आहे. त्यांनी इतरानांही मदत करण्याचे आवाहन केले आहे.