सनी-सेलिनामध्ये ‘वॉशरूम वॉर’

0

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते तेव्हा तिला मुंबईमध्ये भाड्याने घर देण्यासही कोण तयार नव्हते. पण बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने आपले मुंबईतले घर तिच्या या कठीण काळात तिला भाड्याने दिले होते. सेलिनाने मुंबईतील अंधेरी येथील घर सनीला साधारण 2015 मध्ये राहायला दिले होते.

या घरात सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर राहू लागले. सेलिना एकेदिवशी घर पाहण्यासाठी म्हणून घरी गेली असता तिने घराची झालेली दुर्दशा पाहिली. त्याचबरोबर सनीने सेलिनाला न विचारता घरात वेगळे काम करून घेतले होते. सेलिनाला घराची झालेली ही दुरवस्था पाहून आधीच धक्का बसला होता. पण या धक्क्याची जागा रागाने घेतली जेव्हा तिने बाथरूमची अवस्था पाहिली. बाथरूम एवढे घाण होते की, त्यामध्ये जाण्याचे तिने धाडसच केले नाही. चांगल्या मनाने दिलेल्या आपल्या घराची ही अवस्था पाहून सेलिना चांगलीच संतापली. तिने सनी आणि वेबरला तातडीने घर खाली करण्यास सांगून त्यांना कायदेशीर नोटीसही बजावली होती.