सपा, बसपाची युती तुटण्याची शक्यता; मायावतींनी दिले संकेत

0

लखनौ: उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी समाजवादी पार्टी बरोबरची युती तोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे मायावतींनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये सपा, बसपाने युती केली होती. दोघांच्या युतीला अपेक्षित यश मिळाले नाही.