जळगाव। राज्यशासनाने लोकनियुक्त नगराध्यक्षाप्रमाणेच गावाचा सरपंच देखील लोकनियुक्त पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेबर-ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यातील मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकनियुक्त सरपंच निवडणुक जाहीर झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या 241 गावातील सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. तसेच सरपंच पदासाठी 7 वी पासची अट टाकण्यात आल्याने सुशिक्षीत वर्ग राजकारणाकडे वळू पाहत आहे. सरपंच होऊ इच्छिणार्यांनी हौशींनी आपला जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील 1151 ग्रामपंचायतींपैकी सुमारे 900 ग्रामपंचायतीच्या निवडणुका दोन वर्षापूर्वी पार पडल्या आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै अथवा ऑगस्ट 2020 मध्ये होणार आहेत. त्या आधी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील 241 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. जळगाव 23, जामनेर 15, धरणगाव 20, एरंडोल 7, भुसावळ 9, यावल 15, रावेर 33, मुक्ताईनगर 6, बोदवड 5, अमळनेर 30, चोपडा 18, पारोळा 20, पाचोरा 4, भडगाव 11, चाळीसगाव 25 ग्रामपंचायतींनी निवडणुक सप्टेंबरमध्ये होणार आहे.